पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल   

पुणे : ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलीस दलात पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्याचे आदेश शुक्रवारी गृहविभागाने दिले.परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेले संदीपसिंग गिल यांची यापूर्वी ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती. त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. 
 
पंकज देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर गिल यांना पोलीस उपायुक्तपदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गिल हे सोमवारी (१९ मे) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्विकारणार आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेल्या गिल यांनी गणेशोत्सवातील बंदोबस्त, तसेच अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा बंदोबस्त पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांशी सातत्याने साधलेल्या संवादामुळे गिल हे लोकप्रिय अधिकारी ठरले होते.

Related Articles